File photo
File photo
स्थानिक बातम्या

श्रीरामपूर : वाशिम जिल्ह्यातील व परप्रांतीय 68 मजुर प्रशासनाच्या ताब्यात

Sarvmat Digital

वडाळा महादेव (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात वाशीम येथील 34 व परप्रांतीय 34 असे एकूण 68 मजूर वर्ग आपल्या घरी जात असताना प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांना दोन निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे.
वडाळा महादेव येथील बस स्टँड परिसरात मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातील काही नागरिक तसेच मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर येथील नागरिक लहान मुला बाळासह पायी प्रवास करत होते. यावेळी  काही स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती प्रशासनास दिली. तात्काळ तहसीलदार प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत, सदर व्यक्तींची चौकशी केली.
त्यावर त्यांनी वाशिम जिल्ह्यातून कामानिमित्त तसेच मध्य प्रदेशमधून कामानिमित्त आलो असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. याच परिसरातील दोन कार्यालयांमध्ये निवारा केंद्र तयार करून त्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आहे. काल दुपारी तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉ. मोहन शिंदे तसेच त्यांच्या पथकाने या मजुरांची वैद्यकीय तपासणी केली.
सदर दोन्ही ठिकाणी ३४-३४  लहान-मोठे व्यक्ती ठेवण्यात आले आहे. सदर व्यक्तींची श्रीरामपूर येथील गुरुद्वारा येथून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या सांगितल्यानुसार श्रीरामपूर येथील अनेकांनी सदर नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी वडाळा महादेव ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com