Video : राहुल गांधींच्या बॅनरला काळे फासले; एमजी रोडवरील घटना
स्थानिक बातम्या

Video : राहुल गांधींच्या बॅनरला काळे फासले; एमजी रोडवरील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : एमजी रोड वरील काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासल्याचा प्रकार आज दुपारी घडला. यावेळी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत रस्त्यावर बैठे आंदोलन केले.

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभर जोरदार ट्रोल केले जात आहे. दरम्यान शहरातील एम जीरोड वरील काँग्रेस कमिटीच्या प्रवेशद्वारावर राहुल गांधींचा फलक लावण्यात आला होता. या फलकावर दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात इसमांनी काळे फासल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी पोलिसांनी धाव घेत सदर बॅनर, शाईची बाटली, कपडा व इलेक्ट्रिक फिटिंगसाठी वापरली जाणारी प्लास्टिक पट्टी जप्त केली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुल गांधी यांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन सुरू असताना कांग्रेस कार्यालयाबाहेर हा प्रकार घडल्याने भाजप कार्यकर्त्यांचे हे कृत्य असावे असा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात नारेबाजी करत रस्त्यावर बसकन मारली. त्यामुळे एम जी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली.

तसेच भाजपचे जवळच आंदोलन सुरू असताना काँग्रेस कार्यालयाच्या परिसरात एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला

Deshdoot
www.deshdoot.com