त्र्यंबकेश्वर : पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार : आमदार खोसकर

त्र्यंबकेश्वर : पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार : आमदार खोसकर

हिरडी : आमदार हिरामण खोसकर यांनी हिरडी येथे भेट देत नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या. नागरिकांच्या समस्यांवर संबंधित अधिका-यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबतही निर्देश यावेळी देण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी पाणी टंचाई सह रोजगार, आरोग्याबाबत समस्या मांडल्या. आमदार खोसकर यांनी समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार निवारण्याचे आदेश दिले. तसेच लवकरच पाण्याची समस्या प्राधान्याने सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच गावातील व इतर वस्तीवर आवश्यक त्या ठिकाणी वीज पोहचवण्याचे काम करणयात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे करोनाबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.

यावेळी सरपंच मुरलीधर खोटरे, उपसरपंच गजीराम महाले, अंगणवाडी सेविका, गावातील ग्रामस्थांसह तरुण सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com