त्र्यंबकचा बाळू बोडके सलग दुसऱ्यांदा ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’
स्थानिक बातम्या

त्र्यंबकचा बाळू बोडके सलग दुसऱ्यांदा ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : कसबे सुकेणे येथे झालेल्या स्पर्धेत बाळू बोडके यांनी अंतिम सामन्यात कुकडे यास पराभूत करत दुसऱ्यांदा उत्तर महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे, असे करणारा तो जिल्ह्यात पहिला खेळाडू ठरला.

बाळू हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथील रहिवासी असून त्यांच्या यशाने नाशिक- त्र्यंबकेश्वरच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा लावला आहे. सलग दुसऱ्यांदा उत्तर महाराष्ट्र केसरी होत तब्बल १८ वर्षानंतर ही गदा पुन्हा तालुक्यात आणली. यापूर्वी ही कामगिरी येथील परशुराम पवार यांनी केली होती.

बाळू हा सध्या पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुल मध्ये वस्ताद अमोल काका बराटे व गुरू हनुमान आखाडा साकुर फाटा येथे ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे डावपेच व धडे गिरवत आहे,

Deshdoot
www.deshdoot.com