त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेमधील कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन मागे

त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेमधील कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन मागे

त्र्यंबकेश्वर : (दि.८) रोजी त्रिंबक नगर परिषदेमधील कंत्राटी सफाई कामगारांनी स्वतःला अर्धे गाडून घेत अनोखे आंदोलन केले होते. अखेर मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले आहे.

दरम्यान सफाई कामगार म्हणून काम करुन गेल्या अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करुनही वेळोवेळी पदरी निराशा पडत होती. आज सकाळच्या सुमारास कामगारांनी स्वतः ला अर्धे जमिनीत गाडून घेत तीव्र आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती.

यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी कंत्राटी कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी डॉ. निकम यांनी यासंदर्भात दोन दिवसात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com