इंदिरानगर : भरदिवसा घरफोडी करत अडीच लाखांंचा ऐवज लंपास
स्थानिक बातम्या

इंदिरानगर : भरदिवसा घरफोडी करत अडीच लाखांंचा ऐवज लंपास

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

इंदिरानगर | वार्ताहर

एकामागून एक लगातार घरफोड्या झाल्याने इंदिरानगर परिसरामध्ये नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवपासुन इंदिरानगर परिसरामध्ये घरफोडीचे सत्र सुरूच आहे. चार्वाक चौक परिसरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भार्गव हाइट्स येथे राहणारे सुंदर शेट्टी (57) यांच्या ८ क्रमांकाचा बंद असलेला सदनिकेचे कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे सह सुमारे अडीच लाखाचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. रविवार (दि. 18) रोजी शेट्टी नेहमीप्रमाणे आपल्या पानटपरी व्यवसायाच्या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता घरातून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर त्यांचा सोबत मुलगा रोहन सुद्धा महाविद्यालयासाठी निघून गेला. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर जाऊन पाच वाजेच्या सुमारास घरी आल्या.

त्यावेळी दरवाज्याचा कोंडा तुटलेला आढळून आला असता घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. तसेच कपाटातील व पलंगात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याची उघडीकिस आले. या प्रकरणी शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून व पो. नी. महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com