Video : येवल्याच्या रस्त्यावर ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार; पाईपांनी भरलेला ट्रक आगीत जळून खाक
स्थानिक बातम्या

Video : येवल्याच्या रस्त्यावर ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार; पाईपांनी भरलेला ट्रक आगीत जळून खाक

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

येवला | प्रतिनिधी

मनमाड येवला महामार्गावर पाईपच्या ट्रकला आग लागली असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ट्रकसह पाईप जळून खाक झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, एक ट्रक गुजरातहुन तामिळनाडूकडे पाइप घेऊन जात होता. ट्रक मनमाड शहर ओलांडून येवल्याकडे निघाला असता सावरगाव येथील पुलाजवळ अचानक आग लागली.

आगीचे मोठे लोळ दिसत असल्याने जवळपासच्या नागरिकांनी धाव घेतली असता गाडीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला असल्याने अग्निशमन विभागाला कळवण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रकसह पाईप जळून खाक झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com