तुम्ही पाठवलेला मॅसेज होणार गायब; व्हाट्सअँपचे नवे फिचर
स्थानिक बातम्या

तुम्ही पाठवलेला मॅसेज होणार गायब; व्हाट्सअँपचे नवे फिचर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : तुम्ही एखाद्याला पाठवलेला मॅसेज आपोआप डिलीट किंवा गायब झाला तर? हो हे शक्य आहे. लवकरच व्हाट्सअँप वर नवे फिचर येणार असून याद्वारे तुम्ही पाठवलेला मॅसेज पाच मिनटात गायब किंवा डिलीट होणार आहे.

व्हाट्सअँप हे मॅसेजिंग फिचर सध्याच्या घडीला आवश्यक झाले आहे. प्रत्येकाकडे या व्हाट्सअँप पाहावयास मिळते. परंतु काहीवेळा मॅसेजचा भडीमार झाल्याने युझरला त्याचा त्रास होतो तसेच मोबाईलची स्पेसही भरली जाते. यावर उपाय म्हणून हे फिचर लवकरच लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईलमधील स्पेस रिकामी होण्यास मदत होणार आहे. या फीचरचे नाव disappearing message असून पाच मिनटात मॅसेज डिलीट होणार आहेत.

असे असेल फिचर

या फीचरमध्ये ग्रुप ऍडमिन्स या सेटिंग्स ऑपरेट करू शकतील. यामध्ये एक दिवस , एक आठवडा, एक महिना, एक वर्ष असे ऑप्शन दिले आहेत. ज्यापद्धतीने तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते ऑप्शन निवडणे आवश्यक आहे. तसेच एखादा मॅसेज आपण ठराविक कालावधीत वाचणार आहोत. ग्रुप मॅसेजिंगसाठी हे फिचर वापरण्यात येणार आहे.

दरम्यान आपल्या मोबाईलमध्ये अनेक ग्रुप असतात. यात दिवसागणिक अनेक पोस्ट येऊन पडतात. अशावेळी आपल्याला डिलीट करण्यात वेळ नसतो किन्वा त्रास होतो. त्यामुळे या फीचरचा फायदा होणार आहे.

असले तरीही व्हाट्सअप च्या नकळत लोकांचे एडिक्शन मोठ्या प्रमाणात यामुळे वाढणार आहे. कारण आपण जर ठराविक वेळात मेसेज पाहिला नाही तर तो त्या वेळात ऑटोमॅटिक डिलीट होईल यामुळेच मोठ्याप्रमाणात इंटरनेटचा वापर सुद्धा होण्याची शक्यता दिसून येत आहे.

-तन्मय दीक्षित , सायबर तज्ञ

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com