‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांसाठी जीओचा २५१ रुपयांचा खास प्लॅन

‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांसाठी जीओचा २५१ रुपयांचा खास प्लॅन

मुंबई : कोरोना व्हायरसने देशभरात आपले प्रस्थ वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक खाजगी कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे. रिलायन्स जिओने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी खास प्लॅन लॉन्च केला आहे. २५१ रुपयांचा हा प्लॅन असून याला ‘Work From Home Pack’ असे नाव देण्यात आले आहे.

रिलायन्स जिओ सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी तसंच नवी ग्राहक आकर्षित करण्यासाठी नवेनवे प्लॅन्स सादर करत असते. कोरोना मुळे राज्यभरातील कर्मचारी घरी बसून काम करीत त्यांना वर्क फ्रॉम होम मुभा दिली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्स जिओने खास प्लॅन सादर करुन खुशखबर दिली आहे.

दरम्यान २५१ रुपयांचा असून या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दर दिवशी २ जीबी डेटा देण्यात येईल. २ जीबीची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होईल. म्हणजेच ६४ kbps या स्पीडने इंटरनेटचा लाभ युजर्स घेऊ शकतील. या पॅकची ५१ दिवसांची व्हॅलिटीडी आहे. मात्र या पॅकमध्ये व्हॉईल कॉल आणि एसएमएस ची सुविधा देण्यात आलेली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com