व्हाट्सअँप अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी अवश्य करा !

व्हाट्सअँप अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी अवश्य करा !

मुंबई : भारतसह जगभरात व्हाट्सअँप वापरणाऱ्यांची संख्या दोनशे कोटीच्या आसपास आहे. व्हाट्सअँपच्या माध्यमातून चॅटिंग, शेअरिंग व इतर फीचरमुळे हे अँप वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हॉट्सअँपमध्ये प्रायव्हेट डेटा सेव्ह असतो. अशातच फोनची चोरी झाल्यास मोठया नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. अशावेळी काय काळजी घ्यावी हे लक्षात घेतले पाहिजे.

व्हाट्सअँप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. याद्वारे वापरकर्त्यांच्या अनेक महत्वाच्या गोष्टी यामध्ये सेवा केलेल्या असतात. अशा वेळी फोन चोरी झाल्यास व्हाट्सअँप मधील असलेला सर्व डेटा इतरांच्या हाती जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच फोन चोरी झाल्यास व्हाट्सअँप अकाऊंट रिकव्हर कसे करावे आणि सुरक्षित कसे ठेवावे, यासाठी सर्वप्रथम सिम ब्लॉक करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर किंवा १९८ या क्रमांकावर संपर्क करु शकता

फोन चोरी झाल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक ठरते.

व्हाट्सअँप लॉगइन करा:
आता फोनमध्ये नवे सिम ऍक्टिव्हेट करा. नवे सिम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर फोनमधून व्हॉट्सअँप अकाऊंट लॉगइन करा. व्हॉट्सअँप एकावेळी एकाच फोनवर काम करते. त्यामुळे चोरी झालेल्या फोनवरुन व्हॉटसअ‍ॅप आपोआप लॉगआऊट होईल.

व्हाट्सअँप इमेल करा:
व्हाट्सअँप अकाऊंट डिऍक्टिव्हेट करण्यासाठी व्हॉट्सअँपला ईमेल करा. यासाठी तुम्हाला कंट्री कोड (+91) तुमचा मोबाईल नंबर आणि ‘Lost/Stolen: Please deacticate my account’ असा मेसेज टाईम करुन सेंड करायचा आहे. यामुळे तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट डिलिट न होता काही वेळासाठी डिऍक्टिव्हेट म्हणजेच बंद होईल.

बायोमीट्रिक ऑथेंटिकेशनचा वापर करा:
तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट बायोमीट्रिक ऑथेंटिकेशनने सुरक्षित करा. त्यासोबतच तुम्ही जर टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरु केले तर नक्कीच फायदा होईल. यामुळे दुसरं कोणालाही तुमचे व्हॉट्सअँप अकाऊंट लॉगइन करण्यासाठी पासकोडची गरज पडेल. परिणामी तुमचे व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट सुरक्षित राहील. सिम कार्ड किंवा फोन हरवल्यानंतर टू-स्टेप व्हेरिफिकेशन नक्कीच कामी येईल.

मोबाईल चोरी झाल्यानंतर घाबरून न जाता या ट्रिक्सचा वापर करुन आपला मोबाईल डेटा सुरक्षित ठेवा.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com