एअरटेल वाय-फाय कॉलिंगने ओलांडला दहा लाखांचा टप्पा

एअरटेल वाय-फाय कॉलिंगने ओलांडला दहा लाखांचा टप्पा

मुंबई : भारतातील नवीन नेटवर्क तंत्रज्ञानापैकी एक एअरटेल वायफाय कॉलींग या सेवेने उंच भरारी घेतली असून, दहा लाख ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे.भारती एअरटेल (एअरटेल) ही भारतात वायफायवर व्हॉईस ओव्हरची सुरुवात करणारी पहिली मोबाईल ऑपरेटर कंपनी ठरली आहे. ग्राहकांच्या अभूतपूर्व सकारात्मक प्रतिसादानंतर, कंपनीने देशभरात ही नाविन्यपूर्ण सेवा सुरू केली आहे. संपूर्ण भारतभरातील एअरटेल धारकांसाठी एअरटेल वायफाय कॉलींग ही सेवा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, एअरटेलधारक आता कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी वायफाय नेटवर्कवरून वायफाय ची सुविधा घेऊ शकतात.याचा लाभ म्हणजे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत सेवा त्यांना मिळू शकणार आहे.एअरटेल स्मार्टफोनधारक ग्राहकांना वायफाय कॉलींग मुळे एका सुरळीत,अंतर्गत व्हॉईस कॉलींग सेवेचा अनुभव मिळणार आहे.

या अत्याधुनिक आणि अचूक तंत्रज्ञानात उपलब्ध वायफायचा वापर करून, उच्चतम दर्जाची व्हॉईस कॉलींग सेवा मिळण्यासह ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर टेल्को दर्जाची अर्थात पूर्णत: तपासलेल्या गुणवत्तेचे कॉल करता येणे शक्य झाले आहे. हा ग्राहकांसाठी एक सुखद धक्का असून, एअरटेल वायफाय कॉलींगला सहजतेने जोडले गेल्याने त्यांना मिळणाऱ्या सोयींमध्ये नाट्यमयरित्या वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे,एअरटेल वायफाय कॉलींग च्या माध्यमातून फोन करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. कोणत्याही अतिरिक्त अ‍ॅप किंवा सिमकार्डशिवाय, ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनवरू थेट एअरटेल वायफाय कॉलींगचा वापर सुरू करू शकतात. भारती एअरटेलचे सीटीओ रनदीप सेखोंन यांनी सांगितले, एअरटेल वायफाय कॉलींगला ग्राहकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसादामुळे आम्ही आनंदीत झालो आहोत.

या तंत्रज्ञानामुळे अंतर्गत नेटवर्कच्या दर्जात कमालीची सुधारणा झाली असून, त्याचा लाभ एअरटेल ग्राहकांना विशेषत: दाट लोकवस्तीच्या शहरी भागातील ग्राहकांना मिळतो आहे. ही सेवा देशभरात ‘लाईव्ह’ करणारी भारती एअरटेल ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे आणि कोणत्याही वायफायवरून ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com