जिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी

Sarvmat Digital

संगमनेर (वार्ताहर) – कोरोनोच्या पार्श्वभूमीवरती राज्यात सुरू असणारी संचारबंदी व राज्याच्या रक्तपेढीत रक्ताची उपलब्धता कमी होत आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने रक्तदान करण्यासाठीची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते .त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका दिवसात 352 शिक्षकांनी यासाठी नोंदणी केली आहेत.

राज्यातील रुग्णांसाठी रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. रक्ताच्या अपूर्ण उपलब्धतेमुळे रक्तदान करणाऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षण विभागाच्यावतीने एक गुगल लिंक विकसित करण्यात आली होती .ती व्हाट्सअप च्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या नोंदणीच्या आधारे पहिल्या दिवशी 352 शिक्षकांनी रक्तदानाची इच्छा व्यक्त केली आहे.

या शिक्षकांना रक्तदान करता यावे यासाठी प्रशासनाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे.संचार बंदीच्या काळातही शासनाचे नियमाचे पालन करून रक्तदान करता यावे या दृष्टीने प्रयत्न शिक्षकांना रक्तपेढी नाव दिनांक वेळ व त्यासाठी पास सुविधा मिळणार असल्याचे समजते. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी पहिल्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदविला आहे. येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढेल असे सांगण्यात आले.

राज्यातील पहिलाच प्रयोग

राज्यभर रक्ताची मोठ्या प्रमाणावरती गरज भासत आहेत .ही बाब लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने यासाठी उचित नियोजन केले आहे. रक्ताची गरज भागविली जावी यासाठी सामाजिक माध्यमांचा उपयोग करून रक्तदात्यांची नोंदणी केली आहे. त्यामुळे राज्याची रक्ताची गरज भागविण्याच्या दृष्टीने हा केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे. असा प्रयत्न करून रक्तदानासाठी प्रेरित करणारी अहमदनगर जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठेरली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com