देशातील पहिली वाईल्ड लाईफ वाईन ‘काडू’ महाराष्ट्रात दाखल; व्याघ्र संवर्धनासाठी ‘सुला विनियार्ड्स’चा पुढाकार
स्थानिक बातम्या

देशातील पहिली वाईल्ड लाईफ वाईन ‘काडू’ महाराष्ट्रात दाखल; व्याघ्र संवर्धनासाठी ‘सुला विनियार्ड्स’चा पुढाकार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

देशातील नामवंत वाईन कंपनी असलेल्या सुला विनियार्ड्सतर्फे ‘काडू’ ही भारतातील पहिली वाईल्ड लाईफ वाईन महाराष्ट्रात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वाईनच्या विक्रीतून मिळालेला निधी एका संस्थेच्या माध्यमातून ते देशातील वाघांचे संवर्धन करण्यासाठी वापरणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, काडू ही देशातील पहिली अशा प्रकारची वाईन असून शाश्वत वाईनरी म्हणून जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या सुलाच्या कर्नाटक येथील प्रकल्पात या वाईनची निर्मित केली जात आहे. नुकतीच ही वाईन महाराष्ट्रात दाखल झाली असून लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वाईन मेकर करण वसानी यांनी उच्च प्रतीच्या वाईन ग्रेप्सची निवड करतांना काडू या शृंखलेतील चार वाईन्सची निर्मिती केली आहे. काडू चेनिन ब्लँक ही काहीशी गोडसर चवीची अनुभूती देते.

तर काडू सौविगनॉन ब्लँक ही वाईन हलक्या सुगंधसह हिरवी मिरपूड आणि उत्कट स्वरूपातील फळाची अनुभूती करून देते. काडू शिराझ रोज ही वाईन लुसलुशीत बेरी फ्लेवरचा आनंद मिळवून देते. तर वाईनच्या बाबत चोखंदळांसाठी काडू कॅबरनेट शिराझ ही वाईन हमखास पसंतीला उतरणारी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

काडू वाईनच्या बाटलींवर नामांकित डिझाईनर सिमॉन फ्रॉउस यांनी आपल्या खास शैलीतील हस्तकलेतून वाघाचे चित्र साकारले आहे. या प्राण्यासाठी कर्नाटक हे माहेरघर आहे.

मात्र गेल्या अनेक वर्षांत शिकार व अन्य काही कारणांमुळे देशाचा राष्ट्रीय प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाघांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने काम हाती घेतांना सुला विनियार्ड्स वाईन क्षेत्रात आमूलाग्र बदल प्रस्थापित केला आहे. काडूच्या प्रत्येक बाटलीच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून सुलातर्फे वाघांच्या रक्षणासाठी देणगी दिली जाणार आहे. दरम्यान, संकलित होणारी रक्कम सुला विनियार्ड्सतर्फे सॅनच्युरी नेचर फाउंडेशन यांच्या माध्यमांतून सुपूर्द केली जाणार आहे.

सुला विनियार्ड्सचे संस्थापक आणि सीईओ राजीव सामंत म्हणाले की, व्यावसायिकांना पर्यावरणाप्रती त्यांच्या जबाबदारीची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील वाईन निर्मितीत आघाडीवर असतांना, वाघांच्या संवर्धन कार्यात योगदान देण्याचा निर्धार होता.

सर्वोत्कृष्ट वाईन निर्मिती करतांना काडू च्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाबाबत आमचे प्रेम व आदरभाव व्यक्त होतो. कर्नाटकनंतर आम्ही या उदात्त उपक्रमाला महाराष्ट्रातही पाठबळ देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सॅनच्युरी नेचर फाउंडेशनचे संस्थापक बिट्टू सहगल म्हणाले की, सुला विनियार्ड्सतर्फे काडू च्या विक्रीतील काही हिस्सा देण्याचे आश्वासन दिले आहे. आमच्या मड ऑन बुट्स प्रकल्पाला या माध्यमातून बळकटी मिळणार आहे.

कर्नाटकातील वन्यजीव संरक्षणासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना याद्वारे प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्रामध्ये काडू च्या अनावरणाचे आम्ही स्वागत करतो, व येथे देखील तळागाळातील परिस्थितीत सकारात्मक बदल घडविण्यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतो.

Deshdoot
www.deshdoot.com