राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २३० वर; मुंबईत ४ तर पुण्यात एक नवा रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २३० वर; मुंबईत ४ तर पुण्यात एक नवा रुग्ण

मुंबई : मुंबई, पुणे शहरामध्ये आता कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मुंबई मध्ये ४ नवे तर पुण्यात १ कोरोनाबाधित आढळल्याने आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २३० पर्यंत पोहचला आहे.

दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सकाळनंतर आता पुन्हा पाच नवे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.एकट्या मुंबईत ४ नवे रुग्ण ते एक पुण्यातून सापडला आहे. यामुळे सकाळच्या आकडेवारीनंतर आता २३० वर कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली आहे.

दरम्यान सकाळच्या सुमारास महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे ५ नवे रुग्ण आढळून आले होते. मुंबई १, पुणे २, आणि बुलढाणा २, अशा नव्या ५ रुग्णांसह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २२५ वर पोहचला होता.

रुग्ण संख्येत सातत्याने होणारी वाढ चिंताजनक आहे. मात्र यातून अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होत असल्याचे दिलासादायक चित्रही पाहायला मिळत आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकार आरोग्य सेवांसह स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com