भारत -श्रीलंका दुसरा टी-२० सामना; शिखर धवनला संधी
स्थानिक बातम्या

भारत -श्रीलंका दुसरा टी-२० सामना; शिखर धवनला संधी

Gokul Pawar

Gokul Pawar

इंदूर : पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारत श्रीलंका दुसऱ्या सामन्यास थोड्यात वेळात सुरवात होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारत सज्ज असून या सामन्यात शिखर धवनला संधी देण्यात आली आहे.

भारत आणि श्रीलंका या दोन संघांमधील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला रविवार ५ जानेवारीपासून सुरुवात झाली. नव्या वर्षाच्या पहिल्याच सामन्यात भारत विजयाने सुरुवात करेल, अशी भारतीय समर्थकांना आशा होती. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली मात्र अचानक सुरु झालेल्या पावसाने धुवाधार बॅटिंग केली. संपूर्ण मैदान पावसाच्या पाण्याने भरून गेले.

मैदानात असलेल्या सुपर सोपेरने पाणी नियंत्रणात आणण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले. मात्र खेळपट्टीवर असलेल्या ओलाव्यामुळे सामना रद्द करण्यात आला. या मालिकेत भारतीय टी २० संघाचा आणि वनडेचा उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने शिखर धवनला संधी देण्यात आली होती. पण पावसाच्या व्यत्ययाने धवनला याचा फायदा उठवता आला नाही. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे मैदान मध्यप्रदेश संघाचे घरचे मैदान आहे. सर्वाधिक धावसंख्या भारत २६०-५ डिसेंबर २०१७ सर्वात मोठा विजय भारत ८८ धावांनी विरुद्ध श्रीलंका सर्वाधिक धावा करणारा फलंदाज रोहित शर्मा ११८ १२ चौकार आणि १० षटकार सर्वाधिक बळी चहल ४ यष्टीरक्षणात सर्वाधिक बळी २ धोनी क्षेत्रक्षणात झेल २ मनीष पांडे आमनेसामने १६ भारत विजयी ११ श्रीलंका विजयी ५ नीचांकी धावसंख्येचा बचाव भारत १५५ मोठ्या धावसंख्येचा पाठलाग भारत २०६

भारत : शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा नवदीप सेनी कुलदीप यादव आणि युजवेन्द्र चहल

श्रीलंका : लसिथ मलिंगा धनुस्का गुणतिलक, अविष्का फर्नांडो धनंजय डिसिल्व्हा अँजेलो म्यॅथुज , इसरू उडना , कुशल परेरा निरोशन डिकवेल वशिंड फेर्नांडो लाहिरू कुमार , लक्षण सांदकंन वनिंदूं हंसरंग बामूक राजपेक्षा कसून रणजीत

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Deshdoot
www.deshdoot.com