२९ मार्चपासून आयपीएलचा थरार; असे आहे वेळापत्रक

२९ मार्चपासून आयपीएलचा थरार; असे आहे वेळापत्रक

मुंबई : आयपीएल स्पर्धेला २९ मार्चपासून सुरु होणार आहे. सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात वानखेडे मैदानावर होणार आहे. सामन्यांचे वेळापत्रक आठही संघांना पाठवण्यात आले आहे. वेळापत्रकाची अधिकृत घोषणा नंतर करण्यात येणार आहे. हा हंगाम एकूण ५० दिवसांचा असू शकतो.

मागील हंगाम ४४ दिवसांचा होता. अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला होता. यंदाच्या हंगामात एकूण ६० सामने खेळवण्यात येणार आहेत. अखेरचा साखळी सामना मुंबई विरुद्ध बंगळूर यांच्यात बंगळूर येथे होणार आहे.

गतविजेते मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या पहिल्या सामन्यात, २९ मार्च रोजी मागील सत्रातील उपविजेते चेन्नई सुपर किंग्जचा सामना करेल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टी-२० लीगच्या ताज्या हंगामाच्या वेळापत्रकांची पुष्टी केली असून, इतिहासात प्रथमच दुपारचे फक्त सहा सामने होणार आहेत.

असे आहे वेळापत्रक

सलील परांजपे, देशदूत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com