भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३४१ धावांचे लक्ष्य
स्थानिक बातम्या

भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३४१ धावांचे लक्ष्य

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने तडाखेबाज फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियासमोर ३४० धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार यात शंका नाही.

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर-सामन्यांच्या वनडे मालिकेचा दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीनंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारतीय संघासाठी डावाची चांगली सुरुवात केली. टीम इंडियाकडून धवन, कर्णधार विराट कोहली आणि केएल राहूल या तीन फलंदाजांनी अर्धशतकी कामगिरी केली. धवनने सर्वाधिक ९६, विराटने ७८, तर राहुल ५२ चेंडूत ८० धावा केल्या. कोहली बाद झाल्यावर रवींद्र जडेजाने राहुलला चांगली साथ दिली.

दोंघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. टीम इंडियाकडून जडेजा आणि मोहम्मद शमी अनुंक्रमे १९ आणि १ धावांवर नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅडम झांपा याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आणि सर्वाधिक ३ गडी बाद केले, तर केन रिचर्डसन याने २ विकेट घेतल्या. अशामध्ये पहिले फलंदाजी करत भारताने निर्धारित ५० ओव्हरमध्ये ६ बाद ३४० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात ३४१ धावांचे लक्ष्य दिले. अशामध्ये पहिले फलंदाजी करत भारताने निर्धारित ५० ओव्हरमध्ये ६ बाद ३४० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात ३४१ धावांचे लक्ष्य दिले.

मुंबई वनडे सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघ राजकोट येथे ऑस्ट्रेलियावर पुन्हा एकदा विजयाच्या उद्देशाने खेळत आहे. आजचा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com