Thursday, April 25, 2024
Homeनगरभाववाढ करणार्‍या दुकानदारांवर आता फौजदारी कारवाईचा बडगा

भाववाढ करणार्‍या दुकानदारांवर आता फौजदारी कारवाईचा बडगा

तहसीलदारांचे पथक करणार अचानक तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात दुकानदार घेतलेल्या मालाची बिले देत नाहीत, चढ्या भावाने किराणा माल देत असल्याच्या तक्रारीची दखल जिल्हा पुरवठा विभागाने घेतली आहे. तहसीलदारांनी अचानक किराणा दुकानांची तपासणी करावी. भाववाढीने माल विकणार्‍या दुकानदारांविरोधात फौजदारी कारवाई करावी, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिले आहेत.

- Advertisement -

जीवनावश्यक किराणा वस्तूंची चढया ाावाने विक्री करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पुरवठा विाागाने व्यापारी संघटनेची बैठक घेतली होती. त्यात व्यवहाराची पक्की बिले ठेवणे व ग्राहकाला बिल देण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. तसेच मालाचा भावफलक दुकानाबाहेर लावण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र त्याचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुकानांची पथकामार्फत तपासणी करावी आणि सकृतदर्शनी तक्रारीत तथ्य आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांना दिल्या आहेत. भाववाढ करणाजया दुकानदाराविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आपत्ती व्यवस्थापन 2005 व साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 मधील उचित तरतूदीनुसार फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे.

जे दुकानदार वस्तू व सेवा कर चुकविण्याकरिता ग्राहकांना पक्की बिले देत नाहीत तसेच दुकानदारांनी ज्या होलसेल व्यापाजयाकडून माल खरेदी केला आहे, तेही कर चुकविण्याकरिता पक्की बिले देत नाहीत, असे प्रकार निदर्शनास येत असून यासंदाार्तील तक्रारी येत आहेत. असे दुकानदार व सर्व होलसेल व्यापारी तसेच कायद्याचे अवहेलना करत असलेल्या जिल्हयातील सर्व दुकानदारांची चौकशी करुन वस्तू व सेवाकर अधिनियमांतर्गत त्यांच्यावर कार्यवाही करावी.
– जयश्री माळी,जिल्हा पुरवठा अधिकारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या