तालुक्याच्या ठिकाणी 1 एप्रिलपासून मिळणार शिवभोजन
स्थानिक बातम्या

तालुक्याच्या ठिकाणी 1 एप्रिलपासून मिळणार शिवभोजन

Sarvmat Digital

पैसे न नसणार्‍यांना देखील शिवभोजन देण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वाूमीवर सर्वजण घरात बसले असताना ज्यांना घर नाही त्यांचे, मात्र हाल होत आहेत. याशिवाय हॉस्पिटल किंवा इतर ठिकाणी अडकून पडलेल्यांचीही उपासमारी होते असून अशा गरजूंसाठी शासनाने केवळ 5 रूपयांत शिवथाळी सुरू केली आहे. सोमवारी (काल) नगरमधील सहा ठिकाणी शिवभोजन सुरू झाले असून आता तालुकास्तरावरही 1 एप्रिलपासून (उद्यापासून) ही थाळी मिळणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानंतर जिल्हा पुरवठा विाागाने गरजूंपर्यंत ही थाळी पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. नगर शहरात 10 ठिकाणी शिवोजन केंद्र सुरू होते. यात दुपारी 12 ते 2 यावेळेत 10 रूपयांत जेवण दिले जायचे. नगर शहरासाठी 1 हजार 400 थाळ्यांना मंजुरी होती. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वाूमीवर प्रशासनाने ही शिवोजन केंद्रे बंद ठेवली होती. परंतु राज्य शासनाने सोमवारी ही शिवभोजन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. शिवाय यात महत्वपूर्ण बदल केले. आधी 10 रूपयांना मिळणारी शिवथाळी आता केवळ 5 रूपयांत मिळेल. थाळी मिळण्याची आधीची वेळ 12 ते 2 ही वाढवून ती 11 ते 3 करण्यात आली आहे. शिवाय थाळ्यांचे प्रमाणही वाढवले आहे. आधी केवळ शहरात असलेली ही थाळी आता तालुकास्तरावरही मिळणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकाजयांनी नगर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पत्र देऊन तालुक्याच्या ठिकाणी 1 एप्रिलपर्यंत शिवोजन केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 150 थाळी सुरू होतील. नंतर त्याचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. नगर शहरातील शिवोजन केंद्रचालकांनी शिवथाळी सुरू केली असून गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सध्या ते पाकिट स्वरूपात घरपोहोच थाळी देत आहेत.  तशा सूचना त्यांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नगर शहरातील शिवभोजन चालकांनी पाच रुपयांत हे जेवण द्यावे, तसेच ज्यांच्याकडे पाच रुपये नाहीत, अशा सर्वांना मोफत जेवण उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले आहे. त्यानूसार शिवभोजन चालकांनी देखील त्यास प्रतिसाद दिला आहे. यामुळे भुकेलेल्यांच्या पोटाला अन्न मिळणार आहे.

नगर शहरात 10 केंद्रांवर 1 हजार 400 थाळ्या
आता मिळणार 5 रूपयांना थाळी
वेळ सकाळी 11 ते दुपारी 3
तालुकास्तरावर 150 थाळ्यांना मंजुरी

कृष्णा भोजनालयाचे असे दातृत्व
नगरमधील कृष्णा भोजनालयातर्फे सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोफत जेवण पुरवले जाते. त्यांच्या हॉटेललला शिवथाळी मंजूर आहे. परंतु मध्यंतरी शासनाने शिवथाळी बंद केली तरी कृष्णा भोजनालयातर्फे जिल्हा रूग्णालयातील गरजूंना मोफत जेवण पुरवले गेले. आता शिवथाळी सुरू झाली असून ती 5 रूपयांना असली तरी कृष्णा भोजनालयाकडून ती मोफत दिली जाते. मात्र, जागेआावी थाळी देताना गैरसोय होते. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाने त्या परिसरात भोजनालयासाठी थोडी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ‘कृष्णा’चे संचालक साईनाथ घोरपडे यांनी केली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com