सावेडी परिसरात युवकाची दगड व धारदार शस्त्राने हत्या; शहरात खळबळ
स्थानिक बातम्या

सावेडी परिसरात युवकाची दगड व धारदार शस्त्राने हत्या; शहरात खळबळ

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – एका युवकाची दगड व धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात रविवारी सायंकाळी घडली. अमोल मुरलीधर थोरात (वय- 23 रा. पवननगर, नगर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. सावेडी उपनगरात पवननगरमध्ये गजराज फॅक्टरीच्या समोर ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, थोरात व त्याचे अन्य मित्र हे रविवारी सायंकाळी दारू पिण्यासाठी बसले होते.
दारूची झिंग पडल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. त्याचे पर्यावसन भांडनात झाले. यातून थोरात यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरुण मुलाणी, सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून खूना बाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Deshdoot
www.deshdoot.com