श्रीगोंद्यातील सारीग्रस्त महिलेची जिल्हा रुग्णालयात रवानगी
स्थानिक बातम्या

श्रीगोंद्यातील सारीग्रस्त महिलेची जिल्हा रुग्णालयात रवानगी

Sarvmat Digital

श्रीगोंदा (ता. प्रतिनिधी)- तालुक्यातील यापूर्वी कोरोनाचे पाठविलेले सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याने श्रीगोंदेकरांना मोठा दिलासा मिळाला असला तरीही आता नवीन निघालेला आजार म्हणजे सारीचा एक संशयित रुग्ण आज श्रीगोंद्यात आढळल्याने पुन्हा श्रीगोंदेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदे तालुक्यात कोरोना विषाणूशी संबंधित लोकांचे सर्वच्या सर्व अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत. मात्र आता नव्याने एक महिला रुग्ण समोर आली असून त्या महिलेला सारी आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच व्यक्तीला कोरोनाचे लक्षणे असल्याने तपासणीसाठी तिला नगरला हलविण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com