साई मंदिर 1 जूनपासून सुरू करण्याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत चर्चा

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईसंस्थान प्रशासन 1 जूनपासून साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करणार असल्याची चर्चा प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत झाली आहे. मात्र याबाबत शासनाकडे कोणताही प्रस्ताव मांडला नाही. दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंंगची व्युहरचना आखण्यात आल्याने दीर्घकाळ बंद असलेले साईमंदीर खुले होण्यासाठी ग्रामस्थ तसेच भाविक प्रतिक्षा करत आहे.

शिर्डीत विमानसेवा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. साईबाबा संस्थानने मंदिर खुले करण्यासाठी आराखडा तयार केला असल्याचे समजले असून येत्या 1 जुनपासून साईमंदीर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. याबाबत संस्थानने देखील परिपत्रक काढले नाही. मात्र ऐनवेळी शासनाने मंदिर खुले करण्यासंदर्भात काही तयारी केली आहे का? असे विचारले तर एक तयारी म्हणून संस्थान प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत मंदिर सुरू करण्याबाबत चर्चा झाली.

यामध्ये ऑनलाईन दर्शनपास धारकांना दर्शनासाठी परवानगी दिली जाईल तसेच दर्शन रांगेत दोघांमधील अंतर सहा फूट असेल व प्रत्येक तासाला दर्शनरांग बंद ठेऊन दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे भाविकांनी समाधी समोर जास्त वेळ उभे राहू नये; म्हणून साईसमाधीवरील काच लावण्यात येणार असल्याचे समजते.

शिर्डीतील साईमंदीर खुले व्हावे ही देशभरातील करोडो साईभक्तांची मागणी आहे. परंतु संस्थान प्रशासनाने सोशल डिस्टस्निगंचे सर्व काही नियम तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली प्रायोगिक तत्त्वावर जरी मंदिर खुले करून दिले तरीही जोपर्यंत देशातील पब्लिक ट्रान्सपोर्ट विमानसेवा, रेल्वेसेवा व बससेवा सुरू होत नाही तोपर्यंत शिर्डीच्या अर्थकारणाला देखील चालना मिळणार नाही.
– सचिन तांबे, माजी विश्वस्त साईबाबा संस्थान शिर्डी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *