Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरजीवनाश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी आरटीओचा कंट्रोलींग कक्ष

जीवनाश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी आरटीओचा कंट्रोलींग कक्ष

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : रजा, सुट्याही केल्या बंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करण्यासाठी आरटीओंच्या नेतृत्वाखाली कंट्रोलिंग कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात 40 अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून नेमणूक केलेल्यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. खासगी वाहनांना परवानगी व पास देण्याचे काम कंट्रोल रूममधून होणार आहे.

- Advertisement -

मोटार वाहन निरीक्षक विलास कांडेकर यांची या कक्षात प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला आरटीओतील वाहन निरीक्षक, सहाय्यक वाहन निरीक्षक, लिपीक असे 40 कर्मचारी देण्यात आले आाहेत. या कर्मचार्‍यांच्या रजा, सुट्या रद्द करण्यात आल्याचे आदेश आरटीओ दीपक पाटील यांनी काढले आहेत.
जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी परिवहन विभाातील तसेच खासगी वाहनांची गरज भासणार आहे. त्या वाहनांना परवानगी देणे तसेच पास देण्याचे काम हे पथक करणार आहे. जीवनाश्यक सेवा, वस्तू देण्यासाठी प्रसंगी शासन खासगी वाहनांना पास देऊन ते वापरेल, असे संकेत या आदेशातून मिळत आहेत.

ग्रामीण भागात काळा बाजार
दरम्यान, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू म्हणून मानल्या जाणार्‍या किरणासह अन्य वस्तुंची चढ्या दराने विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे विनाकराण नागरिकांची धावपळ सुरू आहे. अनेक ठिकाणी किरणामाल घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावून दिले जात नसल्याच्या तक्रारी किरकोळ विक्रेत्यांनी केल्या होत्या. यामुळे प्रशासनाने किमान किरणामाल विक्रेत्यांना शहरात प्रवेश करू देण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या