Thursday, April 25, 2024
Homeनगरराज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक सिव्हिल मधून गायब; कोरोना संशयित म्हणून होते...

राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक सिव्हिल मधून गायब; कोरोना संशयित म्हणून होते क्वारंटाईन

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल झालेले राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक अचानक गायब झाले आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला असून या निरीक्षकांचा शोध तोफखाना पोलीस घेत आहे.
कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 27 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तिघांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तर, एकाचा पुणे येथे मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले जाते. कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्या व्यक्तीचे स्त्राव घेऊन ते पुणे येथे तपासण्यासाठी पाठवले जातात.
कोरोना संशयित व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केले जाते. कोरोना संशयित असलेल्या शेकडो लोकांची तपासणी दररोज केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षक यांना रविवारी दुपारी संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात भरती केले होते. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्या नंतर त्यांना क्वारंटाईन ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
क्वारंटाईन असतानाही दुय्यम निरीक्षकाने जिल्हा रुग्णालयातून रविवारी सायंकाळी काढता पाय घेतला. यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन आवक झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने तोफखाना पोलिसांना याबाबत माहिती दिली असून तोफखाना पोलीस या निरीक्षकाचा शोध घेत आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या