पुण्यात ५२ वर्षीय कोरोनाबधिताचा मृत्यू; संशयित रूग्णांची संख्या २१५ वर
स्थानिक बातम्या

पुण्यात ५२ वर्षीय कोरोनाबधिताचा मृत्यू; संशयित रूग्णांची संख्या २१५ वर

Gokul Pawar

Gokul Pawar

पुणे : पुण्यात ५२ वर्षाच्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला आहे.

कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारच्या सुमारास पुणे येथील ५२ वर्षाच्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. आज सकाळच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात आणखी १२ नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे.. दरम्यान, पुणे- ५, मुंबई- ३, नागपूर- २, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २१५ वर पोहचली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com