प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला शासनाची मान्यता
स्थानिक बातम्या

प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला शासनाची मान्यता

Sarvmat Digital

लोणी (प्रतिनिधी)- प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज पडणार नाही सदर लॅबमुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून ही राज्य शासनाची मान्याता असलेली ही जिह्यातील पहिलीचं टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठाच्या माॅयक्रोबाॅलोजी विभागाला कोरोना तंत्रज्ञानाला नॅशनल ॲकरेडेशन बाेर्ड फाॅर लॅबरोटरीचे सर्टीफीकेशन व राज्य सरकारची परवानगी मिळाल्या नंतर आयोजीत पत्रकार परिषदेत डाॅ विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी कुलगुरु डाॅ वाय.एम.जयराज, मेडीकल काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ. राजवीर भलवार, माॅयक्रोबाॅयलोजी विभाग प्रमुख डाॅ शरीयार रोशनी , डाॅ रविंद्र कारले उपस्थित होते.
पुढे बोलतांना डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी माॅयक्रोबायलाॅजी विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यंत कमी कालावधीत ‘ट्रुनॅट‘ मशिन व आरटीपीसीआर तंत्रज्ञान स्वीकारत त्यासाठी लागणारे नॅशनल ॲकरेडेशन बाेर्ड फाॅर लॅबरोटरी यांचे सर्टीफीकेशन मिळवले व आता या कोरोनाच्या टेस्टसाठी लॅबला राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे.
यामुळे पुढील काळात परिसरातील रुग्णांना कोरोनाच्या रिपोर्ट साठी आता दोन दिवस थांबण्याची गरज पडणार नाही हे रिपोर्ट फक्त दोन तासातं उपलब्ध होतील ही सेवा आपण ग्रामीण भागात उपलब्ध करुन शकलो यांचा आनंद असल्याचे सांगितले. या लॅब मध्ये शासनाकडून आलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या स्वॅबची मोफत तपासणी केली जाणार आहे
Deshdoot
www.deshdoot.com