प्रवरा रुग्णालयाचे काही डॉक्टर व कर्मचारी विलगीकरण कक्षात
स्थानिक बातम्या

प्रवरा रुग्णालयाचे काही डॉक्टर व कर्मचारी विलगीकरण कक्षात

Sarvmat Digital

श्रीरामपूरच्या ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संबंध आल्याने
लोणी (वार्ताहर) – श्रीरामपूरचा ‘तो’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लोणीच्या प्रवरा रुग्णालयात 4 एप्रिल रोजी आला होता. त्याला तातडीच्या रुग्ण सेवेत तपासण्यात आले. मात्र त्याचा एक्स रे शंकास्पद आल्याने प्रवराने त्याला सिव्हिल रुग्णालयात पाठवले. तेथे त्याचा अहवाल निगेटिव्ह आला मात्र त्यास पुण्याला पाठवल्यानंतर तो पॉझिटिव्ह आल्याने प्रवरा रुग्णालयाने त्याची तपासणी करणारे डॉक्टर, नर्स आणि इतर संबंधित कर्मचार्‍यांना नव्याने उभारण्यात आलेल्या लोणीच्या कोविड 19 रुग्णालयात दक्षता म्हणून विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
सोमवारी श्रीरामपूर येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. तो सध्या पुणे येथे उपचार घेत आहे. त्यापूर्वी 4 एप्रिल रोजी तो लोणीच्या प्रवरा रुग्णालयात आला होता. या रुग्णालयाने त्याला अ‍ॅडमिट करण्याऐवजी तातडीच्या रुग्ण सेवेत ठेऊन त्याची डॉक्टरांनी तपासणी केली. त्याचा एक्स रे काढण्यात आला. मात्र त्याला अ‍ॅडमिट करण्यापूर्वीच त्याचा एक्स रे रिपोर्ट संशयास्पद वाटल्याने डॉक्टरांनी त्याला नगर येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवले. तेथे त्याचा किरोना टेस्टसाठी सॅम्पल घेऊन पुण्याला पाठवण्यात आला. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्याची लक्षणे विचारात घेऊन त्याला पुणे येथे हलवण्यात आले. पुण्यात त्याची दुसरी टेस्ट झाल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. त्याच्यावर सध्या पुण्यातच उपचार सुरु आहेत.
मात्र तो पॉझिटिव्ह आल्याने प्रवरा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने त्याच्याशी संबंध आलेले आठ ते नऊ डॉक्टर, नर्स आणि इतर जवळपास तीस सेवकांना दक्षता म्हणून प्रवरा मेडिकल ट्रस्टने नव्याने स्वतंत्र उभारलेल्या कोविड 19 या लोणीतील रुग्णालयातील विलगीकरन कक्षात ठेवले आहे. मंगळवारी सर्वांचे किरोना टेस्टसाठी नमुने घेण्यात आले असून त्याचा अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेला नव्हता.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com