Tuesday, April 23, 2024
Homeनगरप्रवरा अभिमत विद्यापीठाच्या लॅबला एनएबीएलची मान्यता

प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या लॅबला एनएबीएलची मान्यता

लोणी (वार्ताहर) – प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाच्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाला नॅशनल अ‍ॅक्रिडेरेशन बोर्ड फोर लॅबोरेटरी (NBL) यांची मान्यता मिळाली आहे व ही मोठी उपलब्धी असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.
विद्यापीठाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाला नॅशनल अ‍ॅकरेडेशन बोर्ड फोर लॅबोरेटरी यांची मान्यता मिळाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात डॉ. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजवीर भलवार, मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शरियार रोशनी व पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र कारले उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी मायक्रो बायोलॉजी विभागाने करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी कालावधीत ट्रुनॅट मशीन व आर टीपीसीआर तंत्रज्ञान स्वीकारा, त्यासाठी लागणारे नॅशनल अ‍ॅकरेडेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरी यांची मान्यता मिळवली असून याबद्दल मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख व त्यांच्या सहकार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन असेही ते म्हणाले.
यावेळी कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज यांनी लॅबोरेटरी अ‍ॅकरेडेशन हा एक मैलाचा दगड आहे. मायक्रो बायोलॉजी विभागाने आणखी अधिक संशोधन केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत सध्याच्या काळात प्रयोगशाळेत संशोधकांनी अधिक क्षमतेने कार्य करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले.
डॉ. रोशनी यांनी ट्रुनॅट मशीनबाबत माहिती देताना सांगितले की, फक्त एक ते दीड तासांत करोनाची चाचणी या मशिनद्वारे होणार आहे. अ‍ॅकरेडेशन बोर्डचे सर्व मानदंड आपण पूर्ण केल्यामुळे मायक्रोबायोलॉजी विभागास ही मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
- Advertisment -

ताज्या बातम्या