इंदिरानगर : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

jalgaon-digital
2 Min Read

इंदिरानगर | वार्ताहर

पोलिस आयुक्तालयातील अवैध धंदे कारवाई पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडवलेणी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून साडे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अकरा संशयित आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पांडवलेणी येथील मामू शेख यांच्या मालकीच्या जागेत सुरू असलेल्या तीन पत्ती नावाचा जुगार बेकायदेशीररित्या सुरू होता. पोलिस आयुक्तालयातील अवैध धंदे पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी (दि. 18) शनिवार रात्री दहा वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यात जुगार खेळणारे संशयित घरमालक फरीद मामु शेख (44 रा पांडवलेणी) जुगार अड्डा चालवणारा संदीप दोंदे (36 रा. नरहरी नगर, पाथर्डी फाटा), राजेश खैरनार (32 रा. नवीन नाशिक), संदीप अहिरे (38 रा. क्रांतीनगर पंचवटी), कृष्णा राऊत (35 रा. त्रिमूर्ती चौक), अनिल उगले (34 महाराणा प्रताप चौक), भारत कांबळे (34 रा. दत्त चौक, नवीन नाशिक), समाधान जेजुरकर (36 रा. नांदगाव), मिलिंद भरीत (वय 32 रा. दत्तनगर चिंचोळे, अंबड), सलीम पटेल (34 रा. पांडवलेणी), ज्ञानेश्वर वैराळे (53 रा. गणेश चौक, नवीन नाशिक) पोलिसांनी या सर्वांची अगझडती घेतल्यावर रोख 25000 रपये व त्यांच्या ताब्यातील मोबाईल, दुचाकी आणि चार चाकी सुमारे एकूण सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध जुगार एक ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कार्यवाही पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज करंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुंदन सोनाने, सपोउनी शिरसाठ, पो. ना, वाघ पोशी गवळी, यांच्या पथकाने सदर कार्यवाही केली.

मुख्य संशयित जुगार अड्डा चालविणारा संदीप दोंदे व जागा मालक फरीद मामू शेख यांच्यावर मागच्या महिन्यात अवैध धंदे पथकाने छापा टाकून कारवाई करत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता परंतु काही दिवसाने त्याच जागेवर परत जुगार अड्डा सुरू केला

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *