अन्नातून विषबाधा; बालकाचा मृत्यू, चिचोंडी पाटील येथील घटना
स्थानिक बातम्या

अन्नातून विषबाधा; बालकाचा मृत्यू, चिचोंडी पाटील येथील घटना

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की संभाजी बाबासाहेब ठोंबरे हे चिचोंडी पाटील येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत. बुधवारी रात्री घरातील जेवणामुळे संभाजी यांना व त्यांची पत्नी शुभांगी ठोंबरे तसेच मुलगा सम्राट ठोंबरे (वय- साडेतीन वर्ष) या तिघांना जेवणानंतर उलटी व मळमळ सुरू झाली.

या विषबाधेमुळे सम्राट ठोंबरे यांचा मृत्यू झाला आहे. विषबाधा मुळे लहान मुलाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com