Wednesday, April 24, 2024
Homeनगरसंवाद : जरा जपूनच… सारीही संसर्गजन्य

संवाद : जरा जपूनच… सारीही संसर्गजन्य

संवाद : ज्ञानेश दुधाडे

फिजिशीयन डॉ. पाटील । अचूक निदान, योग्य उपचाराने करता येते मात

- Advertisement -

कोरोना (कोविड-19) विषाणूच्या प्रसारानंतर आता सारी नावाच्या (सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) आजाराची भीती नगरकरांमध्ये पसरतेय. ही भीती अत्यंत चुकीची असून सारी हा कुठलाही नवीन आजार नाही. सारी म्हणजे श्वसन संस्थेशी संबंधित अनेक रोगांच्या लक्षणांचा समुदाय किंवा श्वसन प्रक्रियेशी निगडित आजाराचं लक्षण आहे. सारीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मात करणे शक्य आहे. कोरोनाचा संसर्ग जसा होतो तसाच सारीचाही होतो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे. सारी संसर्गजन्य असला तरी उपचार आहेत. सारी नावाचा आजार नेमका काय, त्यापासून बचाव कसा कराल यासंदर्भात नगरचे फिजिशीयन आणि अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉ. पीयूष पाटील यांच्याशी साधलेला हा संवाद…!

सुरूवातीला औरंगाबाद येथे सारीमुळे काही रुग्ण दगावल्याच्या बातम्या आल्या. गेल्या 15 दिवसांत नगर जिल्ह्यात सारीच्या रुग्णांची वाढत होत असल्याचे सरकारी आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसते आहे. इतकेच काय तर कोपरगाव तालुक्यात एका महिलेचा सारीसदृश आजाराने मृत्यूही झालाय. सध्या जिल्ह्यात सारीचे 42 रुग्ण असल्याचे समोर आले. त्यामुळे नगरकरांना त्याची माहिती मिळावी यासाठीचा ‘नगर टाइम्स’चा हा प्रयत्न.

सारी म्हणजे काय ?
– कमी कालावधीत, म्हणजे सात दिवसाच्या आत ताप, खोकला आणि दम लागणे किंवा श्वास घेता न येणे या तक्रारी घेऊन रुग्ण येतो. त्यावेळी डॉक्टरी भाषेत त्याला सारी अवस्था असे म्हणतात. उपचारादरम्यान विविध चाचण्या करून या आजाराचे नेमकं निदान शोधण्याचे काम सुरु असते. 

सारी कशाने होऊ शकतो ?
– व्हायरल इन्फेकशन (विषाणू संसर्ग) स्वाइन फ्लू, कोरोना, बॅक्टरीअल इन्फेकशनमुळे (जिवाणू संसर्ग) सारी होऊ शकते. न्युमोनिया हे सुद्धा सारीचे एक लक्षण आहे. कोरोना या आजारात सारीची बरीच लक्षणे साम्यपणे आढळतात. त्यामुळे सर्व सामान्य जनता सारी नवीन विषाणूं आहे की याबद्दल विचार करताना दिसत आहेत.

– सारी हा नवा आजार आहे काय ?
डॉ. पाटील- सारी हा कुठलाही नवीन प्रकार किंवा आजार नाही. अगदी सोप्या ााषेत सारी बद्दल सांगायच झालं तर, श्वसन प्रक्रियेशी निगडित आजाराच्या तीव्र लक्षणांचा समूह म्हणजे सारी. त्यामुळे कुणीही घाबरून जायचं कारण नाही. वास्तवात सारी विषयी लोकांमध्ये काही गैरसमज आहेत. सारी हा कोणताही नवीन आजार नाही किंवा विषाणू नाही. कोरोनामुळे अलीकडच्या काळात खासगी दवाखाने बंद असल्यामुळे अल्पवधीत अचानक या व्याधी असलेले रुग्ण वाढले आहे. यामुळे जनतेने घाबरण्याची कारण नाही.

– सारी बरा होऊ शकतो का ?
डॉ. पाटील- हो नक्कीच सारी हा आजार अचूक निदान आणि योग्य उपचार पध्दतीमुळे बरा होऊ शकतो. सारी अवस्थेतील प्रत्येकालाच कोरोना आहे असे नाही, याचे अचूक प्रमाण कुणाला माहीत नाही. मात्र सारी मधील काही लक्षणे ही कोरोनामध्ये आढळतात. जशी की, न्युमोनिया होणे, श्वसन प्रक्रियेत अडथळे निर्माण होणे, फुफ्फुस निकामी होणे. या अशा अवस्थेत रुग्णाला व्हेंटिलेवरची गरज ाासू शकते. वैद्यकीय शास्त्रातील सारी संज्ञा ही फार मोठी असली तरी बहुतेक तज्ज्ञ डॉक्टरांना याची माहिती असल्याने त्यावर मात करता येणे सहज शक्य आहे.

सारीचे अचूक निदान शक्य
कोणत्याही रुग्णाला आधी सौम्य ताप, खोखला, श्वास घेण्यास अडचण असल्यास त्यांनी योग्य उपचार आणि निदान करून घेतल्यास त्यांना कोणत्या प्रकारातील सारी आहे. त्यानूसार उपचार करता येणे शक्य आहे. यात काही चाचण्या, रुग्णाच्या छातीचा ऐक्स रे, छातीचे सिटी स्कॅन, रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, शरीरातील पांढजया पेशी, घशातील स्त्राव याची तपासणी केल्यास सारीचे अचूक निदान करणे शक्य आहे. त्यानूसार संबंधीतांवर उपचार करता येतात. सद्य परिस्थितीत कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार सारीवर उपचार करण्यात येत आहेत.

सारी ही नवीन बिमारी नसल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाची दहशत वाढली असून यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेत कोरोनाच्या चाचणीसोबत स्वाईन फ्ल्यूची चाचणी देखील करण्यात येत आहे. कोनोराची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर व्हायरल इन्फेकशन, बॅक्टरील इन्फेकशन यात त्याची वर्गवारी करून उपचार करण्यात येतात आणि त्यातून अनेक रुग्ण ठणठणीत बरे देखील झालेले आहेत.
– डॉ. पीयूष पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या