आता मिळणार सकाळी 5 ते सायंकाळी 5 पेट्रोल

आता मिळणार सकाळी 5 ते सायंकाळी 5 पेट्रोल

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या महसूल सीमा हद्दीमध्ये दररोज पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्री वेळ वाढविण्यात आली आहे. आता सकाळी 5 ते सायंकाळी 5 अशी विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. डिझेल विक्री पूर्वीप्रमाणेच 24 तास सुरु राहील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता सार्वजनिक सोई सुविधांच्या अनुषंगाने पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्रीची वेळ वाढविण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिताच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे..

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com