नाशिक बाजार समिती आवाराबाहेर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
स्थानिक बातम्या

नाशिक बाजार समिती आवाराबाहेर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून बाजार समितीच्या बाहेरील रस्त्यावर सोशल डिस्टनसिंगचे पालन न करता खेरदी-विक्री केली जात आहे.

यात मुंबईतील व्यापरी येतात. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी या भागात संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या,अशी मागणी काँग्रेसचे ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अनिल कोठुळे यांनी केली आहे.

याबाबत शहराध्यक्ष कोठुळे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन ही बाब निर्देशनास आणून देत ही मागणी केली आहे.

शेतकरीचा शेतमाल हा अत्यावश्यक सेवांमुळे २४ तास विक्री करण्याची संमती दिली असतांनाही नाशिक कृषी बाजार समितीने काही शेतमालाची विक्री बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल हा पेठरोड रस्त्यावर रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत एक किलोमीटरच्या परीसरात खरेदी-विक्री होत असतांना प्रचंड गर्दी होऊन कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन केले जात नाही.

बाजार समिती व जिल्हा प्रशासन या दोघांचे दुर्लक्ष झाल्याने खरेदी-विक्री करण्यासाठी येणाऱ्या व्यापार, हमाल, शेतकरी यासह पेठरोडवरील हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दाट लोकवस्तीचे जीवन व आरोग्य धोक्यात आले आहे.

मुंबई येथून भाजीपाला व फळभाज्या घेण्यासाठी अनेक व्यापारी नाशिक मार्केटमध्ये येत आहे. त्यामुळे येथील भागात संसर्ग होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com