Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रऔरंगाबाद : लॉक डाऊनमुळे जोडप्याने व्हिडिओ कॉलवरच उरकला ‘निकाह’

औरंगाबाद : लॉक डाऊनमुळे जोडप्याने व्हिडिओ कॉलवरच उरकला ‘निकाह’

औरंगाबाद : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून १४ एप्रिल पर्यत सर्वत्र लॉक डाऊन आहे. या पार्श्वभूमीवर ऐन लग्नसराईत होणारी लग्नही थांबली आहेत, तर काहींनी थोडक्यात उरकण्यात समाधान मानले आहे. तर औरंगाबाद येथे एका जोडप्याने व्हिडिओ कॉल वरच निकाह केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हे जोडपे चर्चेचा विषय ठरले आहे.

संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोरोना व्हायरस भारतात दाखल झाल्यानंतर हळूहळू त्याचा प्रभाव वाढताना दिसत आहे. या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा वगळता सारे व्यवहार ठप्प करण्यात आले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे इतर नुकसानासोबतच वैयक्तिक प्लॅन्सही फिसकटले. अनेकांनी आपले लग्नसभारंभ, साखरपुडा यांसारखे कार्यक्रम पुढे ढकलले.

- Advertisement -

मात्र औरंगाबाद येथील एका कपलने यावर एक अनोखा उपाय शोधला. त्यांनी चक्क व्हिडिओ कॉलवर निकाह केला. शुक्रवारी (दि.०३) व्हिडिओ कॉलवर यांचा निकाह पार पडला.

सध्या लग्नसराई थांबली असून १४ तारखे नंतर विवाह समारंभ अनलॉक होणार आहेत. दरम्यान या जोडप्याने लॉकडाऊन काळात लग्नाची तारीख येत असल्याने गर्दी टाळण्यासाठी त्यांनी हा हटके पर्याय निवडला.

व्हिडिओ कॉलवर निकाह केल्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन टळलेच आणि निकाह देखील ठरलेल्या वेळेत उरकता आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या