शहरात दोघांच्या आत्महत्या
स्थानिक बातम्या

शहरात दोघांच्या आत्महत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : आडगाव व अंबड येथे दोघांनी राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. रितेश सुधाकर देशमुख (वय 33, रा. शरयू पार्क, आडगाव शिवार) यांनी राहत्या घरात बेडरूममध्ये नायलॉनच्या दोरीने पंख्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येचा दुसरा प्रकार अंबड येथे उघडकीस आला. लेखराज लक्ष्मणदास चलानी (वय 53, रा. पवननगर भाजी मार्केटसमोर, जीवन कुलकर्णी यांच्या घरात, सिडको) यांनी काल अडीच वाजेच्या अगोदर घरात नायलॉनच्या दोरीचे एक टोक पंख्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आडगाव व अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com