‘जागतिक आरोग्य दिनाच्या यंदाच्या थीमविषयी जाणून घ्या?

‘जागतिक आरोग्य दिनाच्या यंदाच्या थीमविषयी जाणून घ्या?

मुंबई : सध्या कोरोनाशी मुकाबला जगभरातील रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेविका, नर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहेत. यंदा ‘परिचारिका आणि दायींना आधार’ अशी जागतिक आरोग्य दिनाची थीम ठेवण्यात आली असून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

जगभरात ७ एप्रिल हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले.

विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.

दरम्यान जगभरात कोरोना व्हायरसाने हाहाकार उडवला आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना यावर काम करीत आहे. जेव्हा अशा प्रकारचे आजार संपूर्ण जगभरात पसरतात तेव्हा जागतिक आरोग्य संघटना महत्त्वाचे भूमिका बजावत असते.

यंदा ‘Support Nurses and Midwives’ अशी थीम आहे. सध्या जगातील सर्व देशांपुढे कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com