Wednesday, April 24, 2024
Homeनगरनजीक चिंचोलीत विजेच्या शॉर्ट सर्किटने किराणा व कापडाच्या दुकानाला आग

नजीक चिंचोलीत विजेच्या शॉर्ट सर्किटने किराणा व कापडाच्या दुकानाला आग

साडे तीन लाखाचे नुकसान
नेवासा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील नजीक चिंचोली येथील विजय अमृतलाल मुनोत यांच्या आंनद किराणामाल व कापडाच्या  दुकानाला आज शनिवार दि.16 मे रोजी  दुपारी 2:15 वाजता विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की,नेवासा तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज नजीक चिंचोली येथे सोसायटी कार्यालयाशेजारी विजय अमृतलाल मुनोत यांचे आंनद किरणामाल व कापडाचे दुकान आहे.शनिवारी दुपारी  दुकान बंद करून ते भेंडा येथे गेले असता मागे दुपारी 2:15 वाजता त्यांच्या बंद असलेल्या किराणा दुकाना मधून धूर येत असल्याचे  गावातील व दुकाना शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी मुनोत यांना भ्रमणध्वनी वरून घटनेची सूचना दिली.
परंतु ते भेंडा येथे असल्याने त्यांना येण्यास वेळ होणार हे जाणून ग्रामस्थांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला आणि आग आटोक्यात आणली.या आगीत दुकानातील एकूण माला पैकी 25 ते 30 टक्के माल जळून गेला.जळून गेलेल्या माला मध्ये रोख रक्कम,साखर,साड्या, लहान मुलांचे रेडिमेड कपडे, बनियन, धने, गोडेतेल, शांपू, टूथपेस्ट, मसाले, फरसाण, शाबुदाना, बिस्कीट, साबण या मालाचा समावेश आहे.वीज वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी आज सकाळ पासून वीज उपकेंद्रातूनच बंद असलेला विदुयत पूरवठा अचानक सुरू झाल्याने श्री.मुनोत यांच्या दुकानात विजेचे शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचे सांगितले गेले.
या आगीत श्री.मुनोत यांचे सुमारे 3 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सरपंच सौ.अनिता पाठक,उद्योजक शिवाजीराव पाठक यांनी भेट देऊन पाहणी केली.
- Advertisment -

ताज्या बातम्या