नेवासा शहरात 19 तारखे पर्यंत 100 टक्के लॉक डाऊन
स्थानिक बातम्या

नेवासा शहरात 19 तारखे पर्यंत 100 टक्के लॉक डाऊन

Sarvmat Digital

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – आज नेवासा शहरात कोरोना बाधित एक रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दि.19 एप्रिल पर्यंत 100 टक्के लॉक डाऊन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.
राज्य शासनाने करोना विषाणूचा (कौव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात स्वथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13/03/2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी याबाबद अधिसुचना निर्गमित केलेली आहे.
त्यात म्हंटले आहे की,नेवासा शहरातील माळीवस्ती, नेवासा खुर्द या भागामध्ये दि.13 एप्रिल  रोजी एक रुग्ण कोरोना बाधित असल्याचे झालेल्या तपासणीत संक्रमित आढळुन आलेला आहे. सदरचा रुग्ण हा नेवासा नगर पंचायत हददीतील रहीवाशी असुन त्याच्यापासुन सदर आजाराचा इतर व्यक्तींना प्रादुर्भाव /प्रसार होऊ नये यासाठी नेवासा नगर पंचायत हद्दीमधील नविन कोर्ट परिसरापासुन नेवासा शहर परिसर व आजुबाजुच्या वस्त्यामधील सर्व अत्यावश्यक सेवा (किराणा दुकान, दुध, भाजीपाला, औषधाचे दुकाने, दवाखाने व नागरी तथा सहकारी बॅका ) यासह इतर सर्व अस्थापना दि.13 रोजी दु. 12.00 वाजेपासुन दि.19 एप्रिल  सकाळी 06.00 वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहेत.
तरी सदर परिसरातील नागरीकानी कौणत्याही परीस्थितीत घराबाहेर पडु नये. सदरच्या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच सटर क्षेत्रातुन वाहनाचे अवागमन प्रतिबंधीत करण्यात येत आहे. स्वच्छता सेवा, पाणी पुरवठा सेवा, आग्निशमन सेवा, विदयुत वितरण सेवा, सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापना यांना या आदेशातुन वगळण्यात येत आहे.
कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता  1860 मधील कलम 188 व साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 नुसार कारवाईस पात्र राहील असे जारी केलेल्या
Deshdoot
www.deshdoot.com