#Oscars2020: ‘पैरासाइट’ठरला ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट चित्रपट

#Oscars2020: ‘पैरासाइट’ठरला ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट चित्रपट

नवी दिल्ली : यंदाच्या ऑस्कर पूरसाकार सोहळ्यात पहिल्यांदाच एका नॉन-इंग्लिश चित्रपटास ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. ‘पैरासाइट’ या दक्षिण कोरियन चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार खेचून आणत इतिहास घडवला आहे. या चित्रपटाने एकूण ४ पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.

दरम्यान अमेरिकेच्या कैलिफोर्निया प्रदेशात असणाऱ्या लॉस एंजेलिस शहरात यंदाचा ऑस्कर २०२० सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लॉस एंजिलिस शहरातील डॉल्बी थिएटर येथे पार पडलेल्या या सोहळ्याचे यंदा ९२ वे वर्ष होते. या पुरस्कार सोहळ्यात ‘पैरासाइट’ या सिनेमाने पूरसाळरानावर आपले नाव कोरले आहे. यानंतर जभरातील चित्रपट समिक्षक आणि अभ्यासकांना मोठा धक्का बसला आहे. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका नॉन-इंग्लिश चित्रपटास ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे.

तसेच ‘जोकर’ चित्रपटासाठी वॉकिन फीनिक्स याला उत्कृष्ट अभिनेता तर, ‘जूडी’ चित्रपटासाठी रिनी जैलवेगर हिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऑस्कर मिळाला आहे. बॉन्ग जून यांना ‘पैरासाइट’ चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ऑस्कर मिळाला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com