कोरोना : केंद्राचे गरिबांसाठी पावणे दोन लाख कोटोचे पॅकेज; जाणून घ्या कोणासाठी काय?
स्थानिक बातम्या

कोरोना : केंद्राचे गरिबांसाठी पावणे दोन लाख कोटोचे पॅकेज; जाणून घ्या कोणासाठी काय?

Gokul Pawar

Gokul Pawar

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या देशावर असलेल्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारत देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला असून कामगार,शेतकरी, भटके यांच्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक लाख ७० हजार कोटींची घोषणा केली आहे.

देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. सर्वकाही ठप्प झाल्याने गोरगरीबाचे रोजगार गेले, अनेकांची उदरनिर्वाहाची साधने बंद पडली, यामुळे घर, कुटूंब चालवायचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडला असतानाचा केंद्र सरकारने या सर्व बाबींचा विचार करून गरीबांसाठी अनेक लाभदायी योजनांची घोषणा केली आहे.

 • पुढील ३ महिने तांदूळ, गव्हाचे तसेच डाळींंचेही गरिबांसाठी मोफत वाटप करणार.
  लॉकडाऊनच्या काळात गरीब उपाशी राहू नयेत म्हणून गरीबांना ५ किलो तांदूळ किंवा गहू पुढील ३ महिन्यांसाठी मोफत मिळणार तर एक किलो डाळही मोफत दिली जाईल. ८० कोटी लोकांना याचा लाभ घेता येईल.
 • देशातील ६३ लाख स्वयं सहायता समुहांना प्रत्येकी २० लाख रुपये मिळणार.                                                                      १०० पर्यंत कर्मचारी असणाऱ्या ऑरगनायझेशन ज्या मध्ये ९०% कामगारांचा पगार १५ हजार पेक्षा कमी आहे, अशा          ऑरगनायझेशनच्या पुढच्या तीन महिन्यांचा PF पूर्णपणे सरकारकडून दिला जाईल.
 • गरीब वृद्ध, गरीब दिव्यांग आणि गरीब विधवांसाठी अतिरिक्त १ हजार रुपये मिळणार.
 • उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना तीन महिने मोफत गॅस मिळणार
  उज्ज्वला योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबांना ३ महिने मोफत गॅस सिलेंडर देण्यात येईल. याचा लाभ ३.३ कोटी कुटुंबाना होणार आहे. वृद्ध, दिव्यांग, पेन्शनर्स यांच्या खात्यात १ हजार रुपये डीबीटीमार्फत दोन हप्त्यांमध्ये देण्यात येईल.
 • देशभरातील ८० कोटी गरीब जनतेला मनरेगा अंतर्गत ५ कोटी कुटुंबांना सरकार मदत करणार
 • मनरेगाअंतर्गत मजुरांना दररोज २०० रुपये देणार.
 • एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार
  शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतील. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम खात्यात जमा करण्यात येईल. तब्बल ८.६९ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल.
 • जनधनअंतर्गत महिलांच्या खात्यात ५०० रुपये टाकण्याचा निर्णय.
 • किसान सन्मान योजनेतील पहिला हफ्ता तत्काळ देणार.
 • वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना ५० लाख रुपयांचा विमा देणार
 • देशातील ६३ लाख स्वयं सहायता समुहांना प्रत्येकी २० लाख रुपये मिळणार.

या योजनांचा लाभ तत्काळ संबंधितांना देण्याच्या सूचना अर्थमंत्री सीतारामन यांनी दिल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com