Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशकेरळच्या आठ पर्यटकांचा नेपाळमध्ये मृत्यू

केरळच्या आठ पर्यटकांचा नेपाळमध्ये मृत्यू

नवी दिल्ली : नेपाळच्या मकवानपूर जिल्ह्यातील दमनमधील एका रिसॉर्टमध्ये केरळच्या 8 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघड झाली आहे. या आठही जणांचा गुदमरून मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. कारण, हे आठही पर्यटक गॅस हिटरचा वापर करीत होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुशील सिंह राठोड यांनी दिली.

हॉटेलमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची ओळख पटली आहे. प्रवीण कुमार नायर (39), शरण्या (34), रंजीत कुमार (39), इंदू रंजीत (34), श्री भद्र (9), अबिनब सोरया (9), अबी निसार (7), आणि बैष्णव रंजीत (2 ) अशी त्यांची नावे आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पर्यटकांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. नेपाळमधील आपल्या दूतावासाने या घटनेवर बारीक लक्ष ठेवले आहे. दूतावासाचे अधिकारी हॉस्पिटलमध्ये तैनात आहेत. आवश्यक मदत करण्यासाठी त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नेपाळमध्ये केरळमधील 8 पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दुःख व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून पर्यटकांच्या कुटुंबांना आणि मित्र परिवाराला सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच यात परराष्ट्र मंत्रालयाने सहकार्य करावे, असे म्हटले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर नेपाळमधील दूतावासाच्या संपर्कात मुख्यमंत्री कार्यालय आहे, असे केरळ सीएमओने म्हटले आहे. उद्या पर्यंत सर्वांचे मृतदेह केरळमध्ये पोहोचतील अशी शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या