नेपाळ : भाविकांची बस दरीत कोसळून १४ ठार तर १९ जखमी
स्थानिक बातम्या

नेपाळ : भाविकांची बस दरीत कोसळून १४ ठार तर १९ जखमी

Gokul Pawar

Gokul Pawar

काठमांडू : नेपाळमधील सिंधूपालचोक या जिल्ह्यात भाविकांच्या बसला अपघात झाल्याने १४ भाविकांचा मृत्यू झाला तर १९ भाविक जखमी झाले आहेत.या बसमध्ये ४० प्रवाशी असल्याचे सांगण्यात येत असून बचाव पथकाकडून मदतकार्य चालू आहे.

दरम्यान ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हि बस कालीचौक मंदिराचे दर्शन घेऊन परतत होती. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.

Deshdoot
www.deshdoot.com