स्मार्ट पार्कींगला नाशिककरांचा उस्फुर्त प्रतिसाद; दहा दिवसांत सात हजार वाहनांची नोंद
स्थानिक बातम्या

स्मार्ट पार्कींगला नाशिककरांचा उस्फुर्त प्रतिसाद; दहा दिवसांत सात हजार वाहनांची नोंद

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : गेल्या आठवड्यापासून शहरात स्मार्ट पार्किंग अधिकृत रित्या सुरु झाली आहे. मागील दहा दिवसांत नाशिककरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत सात हजारांपर्यंत वाहनांची नोंद झाली आहे.

दरम्यान ४ मार्च पासून प्रायोगीक स्मार्ट पार्किंग गो लाईव्ह झाले आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या आपली गाडी पार्क कुठं करावयाची आहे हे करता येत आहे. यासाठीदुचाकी गाडी साठी ५ रुपये प्रतितास तर चार चाकी गाडी साठी १० रुपये प्रतितास असे आकारण्यात येत आहे. शहरातील २८ ठिकाणी ऑन स्ट्रीट आणि ५ ठिकाणी ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

तर ४ मार्च पासून ते १३ मार्च सायंकाळ पर्यंत ६ हजार ९ पंधरा वाहनांची नोंद स्मार्ट पार्किंगमध्ये झाली आहे. यामध्ये चारचाकी वाहने ४ हजार सातशे ४३ तर २ हजार १७२ टू व्हीलर पार्क करण्यात आल्याची नोंद झाली आहे. यावरून लक्षात येते कि नाशिककरांनी स्मार्ट पार्कींगला उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com