Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळाही बंद राहणार

ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळाही बंद राहणार

नाशिक : राज्यातील शाळा आणि विद्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. नुकताच यासंबंधीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने दिला असून या परिपत्रकानुसार सर्व जिल्हा परिषद, सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालये, आयटीआय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

सध्या जगभरात थैमान घातलं आहे ते कोरोना व्हायरसने, कोरोनाच्या भीतीने सर्वच घटकांवर परिणाम झालेला आहे. सध्याचा महिना हा मार्च म्हणजेच महाराष्ट्रातील परीक्षांचा महिना. कोरोनाचा शिक्षण विभागावरसुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे. आरोग्य विभागाकडून शिक्षण विभागाला आज प्रस्ताव देण्यात आला आणि तो शासनाकडून मंजूरही करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यातील सर्व खाजगी, सरकारी शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागातील शाळा चालू राहणार होत्या. परंतु आता ग्रामीण भागातील सर शाळाही बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी यात काळजी करण्याचं कारण नाही; दहावी-बारावीची परीक्षा सध्या सुरू आहेत आणि या प्रस्तावात बोर्डाच्या परीक्षेचा उल्लेख नाही त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल नसेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या