सिन्नर : शिर्डी महामार्गावर अपघातात तरुण ठार

सिन्नर : शिर्डी महामार्गावर अपघातात तरुण ठार

सिन्नर : शिर्डी महामार्गावर पांगरी शिवारात बाबा धाब्याजवळ आज (दि.१०) सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रकने समोरून धडक दिल्याने कोपरगाव तालुक्यातील २७ वर्षीय तरुण ठार झाला.

सिन्नरबाजूकडून येणारी येणारी पल्सर मोटारसायकल व शिर्डी बाजूने येणारा आयशर ट्रक यांच्यात हा अपघात झाला. मयत दुचाकीस्वार वारी शिंगवे ता. कोपरगाव येथील आहे . तर ट्रक निमोण ता. संगमनेर येथील आहे.

वावी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला. उशिरा अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com