चांदवड : कार-ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी जखमी
स्थानिक बातम्या

चांदवड : कार-ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी जखमी

Gokul Pawar

चांदवड | तालुक्यातील चांदवड -देवळा रस्त्यावरील तांगडी शिवारात ट्रक व अल्टो कार यांच्यात भीषण अपघात होऊन चांदवड येथील युवकाचा मृत्यू झाला. या अपघातात एक तरुणीही जखमी झाली असून तिला उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सोमवारी (दि ९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास चांदवड होऊन देवळाकडे जाणारा ट्रक (टी एन २१ बी एस ६०८०) व देवळ्याकडून चांदवडच्या दिशेने येणारी अल्टो कार (एम एच १५ सी एम ०५७३) या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन कारमधील शेखर गणपत कोतवाल (वय ३३, रा. चांदवड) हा युवक गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

दरम्यान या अपघातात एक युवती देखील जखमी झाली असुन तिला अधिक उपचारासाठी नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.आले. याबाबत रात्री उशिरा वडनेरभैरव पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील अधिक तपास करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com