उमराणे : इर्टीगा कारच्या धडकेत युवक जागीच ठार
स्थानिक बातम्या

उमराणे : इर्टीगा कारच्या धडकेत युवक जागीच ठार

Gokul Pawar

उमराणे : रस्ता ओलांडत असलेल्या युवकाला भरधाव कारने धडक दिल्याने सांगवी येथील युवक जागीच ठार झाला. आज सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

दरम्यान हिरासिंग रामसिंग ठोके (४०) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. उमराणे येथून जवळ असलेल्या मुबंई महामार्गावर सांगवी फाट्याजवळ हिरासिंग हे रस्ता ओलांडुन घरी जात होता.

त्याचवेळेस मालेगाव हुन नाशिक कडे जात असलेल्या इर्टीगा कार (एमएच ०४ एचएक्स ९१०७) ने धडक दिली. या धडकेत युवक जबर जखमी झाल्याने जागीच ठार झाला.

देवळा तालुका पोलीस अधिक तपास करीत आहे

Deshdoot
www.deshdoot.com