Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकरोड : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकावर धारदार शस्त्राने वार

नाशिकरोड : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकावर धारदार शस्त्राने वार

नाशिकरोड : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकावर धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना सिन्नर फाटा येथे घडली.

दरम्यान या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक माहिती अशी की इक्बाल शेख भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्याच्यावर सागर कांबळे या युवकाने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.

- Advertisement -

इक्बाल शेख यास तातडीने उपचारासाठी जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यास अधिक उपचारासाठी नाशिक शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी तातडीने पोलीस उपायुक्त विजय खरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी भेट देऊन पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या