देवळा : दहिवड येथे विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
स्थानिक बातम्या

देवळा : दहिवड येथे विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Gokul Pawar

वासोळ : तालुक्यातील दहिवड येथे विजेच्या धक्क्याने एका तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. महेंद्र उर्फ बारकू शंकर वाघ असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वीज पंप चालू करणेकामी गेलेल्या महेंद्र वाघ (३२) यांना विजेचा तीव्र धक्का बसला. त्यांना तात्काळ देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल गेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेंद्र यांना मृत घोषित केले. महेंद्र यांच्या मृतदेहावर देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

महेंद्र यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने त्यांच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक लहान मुलगी, भाऊ बहीण असा परिवार आहे. या घटनेचा देवळा पोलिसांनी पंचनामा केला असून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com