पंचवटी : पोलीस असल्याचे बतावणी करून कामगारांची फसवणुक; अपर अधिक्षकांमुळे बनाव उघड

पंचवटी : पोलीस असल्याचे बतावणी करून कामगारांची फसवणुक; अपर अधिक्षकांमुळे बनाव उघड

नाशिक : पोलीस असल्याची बतावनी करुन जळगावला जाण्यासाठी गाडीत बसवून देण्यासाठी कामगारांकडून पैसे उकळणार्‍या सुरक्षा रक्षकांचा भांडाफोड तेथून जाणार्‍या अपर पोलीस अधिक्षकांनी केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

आरएस मल्टी सर्विस सिक्युरिटी चे सुरक्षारक्षक रवींद्र देवराम गवळी (रा.अश्वमेध नगर नाशिक व राजेंद्र तात्याबा त्रिभुवन (रा. तारवाला नगर नाशिक ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड एमआयडीसी येथील पॉली कॅप कंपनी व संजीत कंपनी हया लाँक डाऊन असल्याने बंद आहेत.

खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने तेथील कामगार सलमान तडवी व जावेद तडवी दोघे (रा. यावल जिल्हा जळगाव) हे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंबड एमआयडीसी येथून पायी मुंबई-आग्रा रोडणे द्वारका अमृतधाम चौफुली येथे आले होते. तेथे महामार्गावरील उड्डाणपूलाचे काम चालू असल्याने तेथे असलेले आरएस मल्टी सर्विस सिक्युरिटी चे सुरक्षारक्षक गवळी व त्रिभुवन यांनी सदर कामगारांना पायी कोठे चाललात असे विचारले. त्यांनी जळगाव येथे जावयाचे आहे असे सांगितले

तेव्हा सदर सुरक्षारक्षक यांनी आम्ही पोलिस आहोत आम्ही तुम्हाला रस्त्याने जाणाऱ्या ट्रकमध्ये बसून देतो तुम्ही प्रत्येकी पाचशे रुपये आम्हाला द्या असे सांगून त्यांच्याकडून १ हजार रुपये घेतले. या कामगारांच्यात आणि सुरक्षारक्षकांच्यात बोलणे चालू असताना त्या ठिकाणावरून नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक वालवलकर जात असताना त्यांनी चौकशी केली.

यावेळी कामगारांनी आम्हाला जळगाव ला जायचे आहे व येथील पोलिसांनी आमच्याकडून हजार रुपये ट्रकमध्ये बसून देण्याकरिता घेतलेले आहेत, असे सांगितले तेव्हा वालवलकर यांनी चौकशी करून तेथे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भोये व त्यांच्या सहकार्‍या्ना बोलावून घेतले व त्यांच्याकडे दोन्ही कामगार व दोन्ही सुरक्षारक्षक पुढील कारवाई करिता सोपवले. पोलीस निरीक्षक भोये यांनी दोन्ही कामगार व सुरक्षारक्षकांना पंचवटी पोलीस स्टेशनला आणून हजर केले. पोलीस नाईक शिवाजी नाना आव्हाड यांनी फिर्याद दिली.

त्यानुसार दोन्ही सुरक्षारक्षकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे .
तर दोन्ही कामगारांना वैद्यकीय तपासणी करून शेलटर होम मखमलाबाद नाका येथे दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.